- म्हणी व वाक्प्रचार :
- म्हणी:
- अ, आ, इ, ई सुरू करणे :
- अर्थ : एखादी गोष्ट पहिल्यापासून शिकायला सुरू करणे.
पूर्वजोड
शब्दाला, शब्दाच्या अगोदर लागू शकणारा एक उपसर्ग-एक पूर्वजोड. हा लागल्यामुळे शब्दाचा अर्थ विरुद्ध होतो.
- भाषांतर करताना घ्यायची काळजी :
प्रत्येक शब्दाला ’अ’ हा पूर्वजोड लावून त्याचा विरुद्ध अर्थी शब्द करताच येतो असे नाही. काही शब्दांना ’अ’ हा पूर्वजोड लावून विरुद्धार्थी शब्द तयार करता येत नाही, उदाहरणार्थ: अचाट
काही शब्दांपासून त्यांचे विरुद्ध अर्थी शब्द तयार करताना, उदाहरणार्थ : कृत्रिम च्या विरुद्धार्थी शब्द अकृत्रिम
एखाद्या शब्दाला आधीच ’अ’ हा पूर्वजोड लागून त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार झाला असेल तर पुन्हा त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार करताना ’अ’ हा पूर्वजोड दुसऱ्यांदा लावला जात नाही, उदाहरणार्थ : असीम च्या विरुद्धार्थी शब्द करायचा असल्यास अ असीम असा शब्द होत नाही (त्याऐवजी, कधी नकाराला नकार म्हणजे होकार या न्यायाने ’अ’ हा मुळचाच पूर्वजोड काढून टाकून वा कधी ’अ’ ऐवजी ’स’ हा पूर्वजोड लावून वा कधी ’अ’ काढून शब्दाला योग्य रूप देऊन ते साध्य केले जाते)
- वाक्यात उपयोग :परमेश्वराची सर्वांवर अपार कृपा असते.
अधिकची माहिती
- एखाद्या शब्दात अ हे पहिले अक्षर असल्यास ते नेहमी पूर्वजोड म्हणूनच आले असेल व पुढील शब्दाचा अर्थ विरुद्ध करतच असेल, असे नेहमीच असत नाही, उदाहरणार्थ : अटक
- शब्दाच्या आरंभी अ जोडला असता तो पुढील सहा अर्थ दाखवतो : सादृश्य / अभाव / भेद, फरक, भिन्नता / कमीपणा, लहानपणा / वाईटपणा / विरोध. टीप - स्वराने सुरु होणाऱ्या शब्दामागे ह्या अ चे अन् असे रूप होते. उदाहरणार्थ, आचार अनाचार इ. [१]
- इतर काही पूर्वजोड : अग्र, अति, अधि, अधो, अन्, अनु, अप, अभि, अव
- विरुद्धार्थी पूर्वजोड : स
- अ हा पूर्वजोड लागून विरुद्धार्थी झालेले काही शब्द : अकंटक, अकथित, अकथ्य, अकरूण, अकर्तृक, अकर्म, अकर्मक, अकलंक, अकल्पनिय, अकल्पित, अकल्याण, अकांचन, अकारण, अकार्पण्य, अकाल, अकालज, अकालिक, अकाली, अकालीन, अकिंचन, अकीर्तनीय, अकीर्ति, अकुंठित, अकुतोभय, अकुलीन, अकृतज्ञ, अकृत्य, अकृत्रिम, अक्रोध, अखंड, अखंडित, अगणनीय, अगणित, अगतिक, अगत्य, अगमनीय, अगम्य, अगोचर, अघटित, अचल, अचर, अचला, अचळ, अचांचल्य, अचाट, अचापल्य, अचिकित्सनीय, अचिंत्य, अचूक, अचेतन, अचैतन्य, अच्युत, अज, अजर, अजरामर, अजाण, अजाणता, अजात, अजिंक्य, अजित, अजीर्ण, अजेय, अटळ, अढळ, अतर्क्य, अतार्कित, अतुल, अतुलनीय, अतुष्ट, अतुल्य, अतूट, अतृप्त, अतृप्ति, अदंडनीय, अदत्त, अदम्य, अदय, अदहनीय, अदाह्य, अदूरदृष्टी, अदार्तृत्व, अदूषणीय, अदृश्य, अदेखणा, अदेय, अदेयदान, अद्राव्य, अद्वितीय, अद्वैत, अद्वैतभाव, अद्वैतवाद, अधम, अधर्म, अधर्मात्मा, अधर्मी, अधार्मिक, अधीर, अधृव, अनिकेत, अनित्य, अनिंद्य, अनिमेष, अनियत, अनियमित, अनियंत्रित, अनिर्वचनीय, अनिर्वाच्य, अनिर्वाह, अनिवार, अनिवार्य, अनिश्चित, अनिष्ट, अनीति, अपंडित, अपत्नीक, अपथ, अपरिचित, अपरिणीत, अपरितुष्ट, अपरिमित, अपरिहार्य, अपरोक्ष, अपवित्र, अपसंत, अपक्ष, अपात्र, अपान, अपानद्वार, अपानवायु, अपाप, अपार, अपुत्र, अपुत्रिक, अपुनर्भव, अपुनरावृत्ति, अपुनर्लभ्य, अपुरा, अपूर्ण, अपूर्णांक, अपूर्व, अपौरुष, अपौरुषेय, अप्रकट, अप्रकृत, अप्रगल्भ, अप्रतिबंध, अप्रतिम, अप्रतिष्ठा, अप्रतिहत, अप्रतीति, अप्रधान, अप्रत्यक्ष, अप्रमाण, अप्रमाणिक, अप्रशस्त, अप्रशिक्षित, अप्रसन्न, अप्रसिद्ध, अप्राप्त, अप्राप्य, अप्रामाणिक, अप्रामाण्य, अप्रासंगिक, अप्रिय, अप्रीति, अप्रौढ, अफल, अबल, अबला, अबाधित, अभक्ति, अभद्र, अभय, अभयंकर, अभाग्य, अभागी, अभाविक, अभिन्न, अभेद, अभेद्य, अभोग्य, अभोज्य, अमर, अमर्याद, अमर्यादा, अमानुष, अमान्य, अमूर्त, अयश, अयोग्य, अरसिक, अरक्षित, अरुचि, अरुंद, अलभ्य, अलक्ष्य, अलिखित, अलिप्त, अलिप्तता, अलौकिक, अवध्य, अवश, अविकल्प, अविचार, अविचारी, अविच्छिन्न, अविद्यमान, अविद्या, अविधि, अविधिमान्य, अविनय, अविनाश, अविनाशी, अविभक्त, अविभाज्य, अविवाहित, अविवेक, अविवेकी, अविश्रांत, अविश्वास, अविश्वसनीय, अविश्वासू, अवीट, अवेळ, अवैद्यकीय, अवैतनिक, अवैध, अव्यक्त, अव्यंग, अव्यग्र, अव्यभिचार, अव्यभिचारी, अव्यय, अव्यवस्थित, अव्यवस्था, अव्यवहार्य, अव्यस्त, , अशक्त, अशक्य, अशांत, अशाश्वत, अशासकीय, अशिष्ट, अशिक्षित, अशुद्ध, अशुभ, अशेष, अशौच, अश्रद्ध, अश्रद्धा, अश्रद्धेय, अश्राव्य, अश्लील, असंग, असंगत, असत्, असंतुष्ट, असंतोष, असत्य, असंबद्ध, असंभव, असंभवनीय, असंभाव्य, असभ्य, असमंजस, असमर्थ, असमाधान, असमाप्त, असहकार, असहाय, असह्य, असाध्य, असार, असावध, असिद्ध, असीम, असुख, असुर, असोशीक, अस्थानी, अस्थायी, अस्थिर, अस्पर्श्य, अस्पृश्य, अस्पष्ट, अस्फुट, अस्वस्थ, अस्वस्थता, अस्वाधीन, अस्वास्थ्य, अहित, अक्षत, अक्षम्य, अक्षय, अक्षर, अज्ञात, अज्ञान, अज्ञानी, अज्ञेय, अज्ञेयवाद.
- केवलप्रयोगी अव्यय : संदेहदर्शक केवलप्रयोगी अव्यय, हा केवलप्रयोगी अव्यय अर्थात उद्गार भाषा निरपेक्ष आहे.
- अर्थ :समोरच्याने सांगितलेल्या अथवा स्वतः सांगणार असणाऱ्या गोष्टीबद्दल संदेह असल्यास निघणारा सहज उद्गार.
- शब्द केव्हा वापरावा :अनिश्चितता दाखवायची असल्यास.
- शब्द केव्हा वापरू नये :साशंकता लपवायची असल्यास.हा उद्गार अतिशय नैसर्गिक असल्याने जवळपास सर्वच भाषेत याचा उपयोग होतो.
- अधिकची माहिती : विचारसाखळीत गुंतलेले असल्याने संभाषणात होणारा सहज विलंब या शब्दाने भरून काढण्याचा कल नैसर्गिक असतो. अ on Wikipedia.Wikipedia
|