मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. न फाडलेले, न तोडलेले, अभग्न असे, समग्र.
  2. जोड न लावता केलेले किंवा शिवलेले, एकसंधी.
  3. ज्याला खंड, अडथळा, विसावा, थांबणूक इ. नाही (तो.)
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • व्युत्पत्ती : संस्कृत : अ + खंड= तुकडा
  • प्रकार : विशेषण
  • 'अखंड' पुढे लागणारे प्रत्यय आणि तयार होणाऱ्या शब्दांचा अर्थ :
  1. -दंडायमान (विशेषण) काठी सारखा लांबच लांब.
  2. -चोळी (स्त्रीलिंगी शब्द) नवऱ्या मुलीने तेलफळाचे वेळी लावायची दोन हातांसाठी दोन तुकडे व पाठ आणि पोट यांच्यासाठी एक तुकडा अशा तुकड्यांची शिवलेली चोळी.
  3. -श्रेढी (स्त्रीलिंगी शब्द) (गणित) एक प्रकारची श्रेणी किंवा श्रेढी.
  4. -द्वादशी (स्त्रीलिंगी शब्द) मार्गशीर्ष शुक्ल द्वादशी
  5. -सौभाग्य (नपुंसकलिंगी शब्द) शेवटपर्यंत टिकणारे वैभव, सवाशीणपणा इ.
  6. -सौभाग्यवती (स्त्रीलिंगी शब्द) जिचे सौभाग्य आमरण टिकले अशी; जी नवऱ्यापूर्वी मेली अशी.


[] अखंड on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे