अकर्म
मराठी भाषा
संपादनउच्चार
|
|
नाम
संपादन- प्रकार : भाववाचक / धर्मिवाचक नाम
वचन
संपादनएकवचन
- अनेकवचन : अकर्मे
लिंग
संपादननपुसकलिंग
- पुल्लिंगी रूप : लागू होत नाही.
- स्त्रीलिंगी रूप : लागू होत नाही.
अर्थ
संपादनन करण्याचे काम / कर्म; वाईट काम / कर्म; दुष्कृत्य; पापकर्म; पाप; गुन्हा.
भाषांतरे
संपादन
|
|
भाषांतर करताना घ्यायची काळजी
संपादनशब्द केव्हा वापरावा
संपादनफारशा गंभीर नसलेल्या वाईट अनपेक्षित कामासाठी हा शब्द वापरावा.
शब्द केव्हा वापरू नये
संपादनगंभीर असलेल्या वाईट अनपेक्षित कामासाठी हा शब्द वापरु नये. त्याऐवजी अधिक तीव्रतादर्शक कुकर्म हा शब्द वापरावा.
वाक्यात उपयोग
संपादन- भारतखंडातील मध्यंतरीच्या जवळपास एक सहस्रकभर अडलेल्या विकासाचे कारण म्हणजे येथील लोकांचे आळसरूपी अकर्म होय.
- अकर्माचे फळ नेहमीच वाईट असते.
वाक्प्रचार
संपादनम्हणी
संपादनसाहित्यातील आढळ
संपादन- तुभ्यं दक्ष कविक्रतो यानीमा देव मर्तासो अध्वरे अकर्म । तवं विश्वस्य सुरथस्य बोधि ...ऋग्वेद: सूक्तं ३.१४ - Wikisource
- किं कर्म किमकमेर्ति कवयोह्यप्यत्र मोहिता:।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेह्यशुभात्।। कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मण:। अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गति:।। गीता
- नेणती जाणते ते हि काय कर्म अकर्म हे । ... अकर्म ते हि जाणावे कर्माचे तत्त्व खोल हे ॥ १७ ॥ ...गीताई अध्याय चवथा - Wikibooks
संधी व समास
संपादनउत्पत्ति
संपादनव्युत्पत्ती
संपादनसंस्कृत : अ अयोग्य ह्या अर्थी + कर्म
अधिकची माहिती
संपादनविभक्ती
संपादनविभक्ती | एकवचन | अनेकवचन |
---|---|---|
प्रथमा | अकर्म | अकर्म |
द्वितीया | अकर्मास, अकर्माला, अकर्माते | अकर्मांस, अकर्मांना, अकर्मांते |
तृतीया | अकर्माने, अकर्माशी | अकर्मांनी, अकर्मांशी |
चतुर्थी | अकर्मास, अकर्माला, अकर्माते | अकर्मांस, अकर्मांना, अकर्मांते |
पंचमी | अकर्माहून | अकर्मांहून |
षष्ठी | अकर्माचा, अकर्माची, अकर्माचे | अकर्मांचा, अकर्मांची, अकर्मांचे, अकर्मांच्या |
सप्तमी | अकर्मात, अकर्मी | अकर्मांत, अकर्मी |
संबोधन | अकर्मा | अकर्मांनो |
तत्सम उच्चारणांचे इतर शब्द
संपादन
|
|