मराठी भाषा

संपादन

उच्चार

  • इंग्रजी (English) : akalank
  • ओरिसी : ଅକଲଂକ
  • कानडी (ಕನ್ನಡಾ) : ಅಕಲಂಕ್
  • गुजराती (ગુજરાતી) : અકલંક
  • तमिळ (தமிள) : அகலம்க்
  • तेलुगू (తెలుగూ) : అకలంక్
  • पंजाबी (ਪਂਜਾਬੀ) : ਅਕਲਂਕ
  • बंगाली (বংগালী) : অকলংক
  • मल्याळम (മല്യാളമ) : അകലംക്
  • संस्कृत (संस्कृतः) : अकलंक
  • हिन्दी (हिन्दी) : अकलंक

विशेषण

संपादन
  • प्रकार : नामसाधित गुणवाचक विशेषण

एकवचन अथवा अनेकवचन

नपुसकलिंगी अथवा पुल्लिंगी अथवा स्त्रीलिंगी

निष्कलंक; कलंकरहित; कलंक नसलेला / नसलेली / नसलेले / नसलेल्या; डागरहित; डाग नसलेला / नसलेली / नसलेले / नसलेल्या

भाषांतरे

संपादन
  • इंग्रजी (English) : untainted (अनटेन्टेड); unstained (अनस्टेन्ड); stainless (स्टेनलेस)
  • संस्कृत (संस्कृत) : अकलंक
  • हिन्दी (हिन्दी) : अकलंक; जिसपर कोई धब्बा न हो ऐसा / ऐसी / ऐसे

भाषांतर करताना घ्यायची काळजी

संपादन

कलंक चा अर्थ हा डाग अथवा दोष असा दोन्ही प्रकारे होऊ शकतो. संदर्भानुसार तो निश्चित करता येतो.

शब्द केव्हा वापरावा

संपादन

शब्द केव्हा वापरू नये

संपादन

वाक्यात उपयोग

संपादन
  • नपुसकलिंगी एकवचनी स्वरूपात : कूपनलिकेच्या खाऱ्या पाण्यात बहुधा क्षार एवढे जास्त असतात की,त्याच्या वापराने नवीन अकलंक भांडे डागाळायला जास्त दिवस लागत नाहीत.
  • नपुसकलिंगी अनेकवचनी स्वरूपात : एरवी धुळीने माखलेली महामार्गावरील घरे पावसाच्या एका शिडकाव्याने कशी अकलंक होतात.
  • पुल्लिंगी एकवचनी स्वरूपात : एका रंगाच्या जाहिरातीत दाखविले आहे की, घोड्यांचा जथ्था धूळ उडवत एका महालाच्या दुतर्फा दौडत निघून जातो, तरीही महालाच्या बाहेरील रंग एवढ्या चांगल्या प्रतीचा असतो की महाल अकलंकच राहातो.
  • पुल्लिंगी अनेकवचनी स्वरूपात : युरोपातील अकलंक रस्ते ही त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे; तर आशियातील लोकांसाठी शिस्त शिकायची.
  • स्त्रीलिंगी एकवचनी स्वरूपात : नुकतीच उभारलेली अकलंक भिंत जाहिरातींनी भरून जायला वेळ लागत नाही.
  • स्त्रीलिंगी अनेकवचनी स्वरूपात  : पितळ्याच्या अकलंक घागरींना कल्हई केल्याशिवाय पिण्याच्या पाण्याची साठवण म्हणून वापरण्याची काही सोय नाही.

वाक्प्रचार

संपादन

म्हणी

संपादन

साहित्यातील आढळ

संपादन

संधी व समास

संपादन
  • संधीयुक्त शब्द

उत्पत्ति

संपादन

+ कलंक, संस्कृत शब्द.

अधिकची माहिती

संपादन
  • कलंक या नामापासून तयार होणारे नामसाधित गुणविशेषण.
  • विरुद्धार्थी शब्द : कलंकित

विशेषण

संपादन
  • प्रकार : नामसाधित गुणवाचक विशेषण

एकवचन अथवा अनेकवचन

नपुसकलिंगी अथवा पुल्लिंगी अथवा स्त्रीलिंगी

दोषरहित; दोष नसलेला / नसलेली / नसलेले / नसलेल्या; शुद्ध; पवित्र; चांगला / चांगली / चांगले

भाषांतरे

संपादन
  • इंग्रजी (English) : pure (प्युअर); divine (डिव्हाईन)

भाषांतर करताना घ्यायची काळजी

संपादन

कलंक चा अर्थ हा डाग अथवा दोष असा दोन्ही प्रकारे होऊ शकतो. संदर्भानुसार तो निश्चित करता येतो.

शब्द केव्हा वापरावा

संपादन

शब्द केव्हा वापरू नये

संपादन

वाक्यात उपयोग

संपादन
  • नपुसकलिंगी एकवचनी स्वरूपात : प्रभु श्रीरामांचे चरित्र हे सर्वार्थाने अकलंक आहे.
  • नपुसकलिंगी अनेकवचनी स्वरूपात : केवळ प्रतिशोधजन्य विचारातून स्फुरणारी कृत्ये अकलंक असू शकत नाहीत.
  • पुल्लिंगी एकवचनी स्वरूपात : पोर्णिमेचा चंद्रसुद्धा अकलंक नाही तेथे सर्वसाधारण मनुष्याच्या चरित्राची काय कथा?
  • पुल्लिंगी अनेकवचनी स्वरूपात : अकलंक विचार चांगल्या अथवा वाईट अशा दोन्ही बंधनातून मुक्त करणार्‍या कृत्यांचे जनक असतात.
  • स्त्रीलिंगी एकवचनी स्वरूपात : माता सीता यांची सारी अकलंक जीवनयात्रा आदर्श पत्नीव्रत पाळणार्‍यांसाठी फार मोठा प्रेरणादायी स्रोत आहे.

वाक्प्रचार

संपादन

म्हणी

संपादन

साहित्यातील आढळ

संपादन

संधी व समास

संपादन
  • संधीयुक्त शब्द

उत्पत्ति

संपादन

+ कलंक, संस्कृत शब्द.

अधिकची माहिती

संपादन
  • कलंक या नामापासून तयार होणारे नामसाधित गुणविशेषण.
  • विरुद्धार्थी शब्द : कलंकित

तत्सम उच्चारणांचे इतर शब्द

संपादन
  • इंग्रजी (English) :
  • मराठी :
  • संस्कृत (संस्कृत) :
  • हिन्दी (हिन्दी) :

अधिकची माहिती

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन