मेळा
- हा लेख नमुना लेख म्हणून निर्मीत करावयाचा आहे. या लेखास परिपूर्ण करण्यास मदत करावी.
- वझे शब्द कोशाने सांगितलेल्या, मेहुणी आणि जजमेंट बाय आर्बीट्रेशन या अर्थाने वापर झालेली उदाहरणे, किंवा अशा उपयोगांबद्दल खात्री करून हवी आहे.
मेळावा हा समानार्थी शब्द ज्ञानेश्वरीत किती पद्धतीने वापरला आहे ते मेळावा हा लेख वाचताना कल्पना येते. कदाचित मेलनम् किंवा मीलन या संस्कृत शब्दात त्याची व्युत्पत्ती दडली आहे का याचा व्युत्पत्ती शास्त्राने उलगडा व्हायला हवा. संमेलन हा सुद्धा तसा समानार्थीच शब्द आहे. मेळा , मोळी, मेळ, माळ, मळा या शब्दांचा व्युत्पत्तिशास्त्रास मान्य नियम होईल असे नाही; पण वैशिष्ट्य असं की मेळा माणसांना एकत्र आणतो, मोळी लाकडांना एकत्र आणते, मेळ अंकांना किंवा जोडण्यास अवघड झालेल्या गोष्टीस एकत्र आणतो, माळ फुलणं एकत्र आणते, मळा वृक्षवल्लींना एकत्र आणतो किंवा संचय दर्शवतो, तरी पण या शब्दांना नियंमाच्या माळेत गुंफता येत नाही. मल या संस्कृत शब्दा पासून बनणारे मळ, मळी हे शब्द आडवे येतात. मेळा शब्दास कन्नडभाषेमध्ये (ಮೇಳ) मेळ असे म्हणतात.
शब्द
संपादन- मेळा
- भाषा
- मराठी
- उद्भव
हा तद्भव शब्द आहे.संस्कृत मेल किंवा मेला या शब्दापासून मेळ मेळावा या शब्दांचा उद्भव स्पष्ट आहे.
- चित्र/छायाचित्र/रेखाचित्र (महाराष्ट्रीय ग्रामीण जत्रेतील मेळ्याचे चित्र/छायाचित्र मूळ आणि प्रताधिकार मुक्त हवे आहे.)
- शब्दाचे आय पी ए उच्चारण,मेडीया फाइल/ऱ्हस्व उच्चारण/दीर्घ उच्चारण/उच्चारणातील आघात
- 'मेळा' तील मे चा उच्चार मेख मधील मे पेक्षा दीर्घ होतो
- मूळ शब्द
- मेळा
शब्दाचे विविध अर्थ
संपादन- मेहुणी(स्त्रीलिंगी एकवचन)
- जत्रा
- लोकांचे एकत्र येणे
- मेळावा
- Judgment by arbitration.(लवादाचा निर्णय, हे भाषांतर ठीक आहे का ?) वझे शब्दकोश
- संबंधित शब्द
- शब्दाचे वाक्यउपयोग
साहित्यातील वृत्त/अलंकार/साहित्यिक प्रतिमा उपयोग
संपादन- सात पाच तीन दशकांचा मेळा । एकतत्त्वी कळा दावी हरि ॥ १ ॥(संदर्भ:हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा,अभंग#२३)भावार्थ
- सांजवेळ ही आपण दोघे
- अवघे संशय घेण्याजोगे
- चंद्र निघे बघ झाडामागे
- कालिंदीच्या तटी खेळतो, गोपसुतांचा 'मेळा
(संदर्भ:मराठी चित्रपटगीत "घननिळा, लडीवाळा, झुलवू नको हिंदोळा" चित्रपट;गीतकार ग.दी.माडगूळकर;गायिका माणिक वर्मा,चित्रपट -उमज पडेलतर -१९६०)[१]
- जीवनगाणे गातच राहावे झाले गेले विसरुन जावे,
पुढे पुढे चालावे सातसुरांचा हा मेळा[२]
- सूडसमाधान मिळाया, प्रमत्त सैतान जमवूनी मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान {कोलंबसाचे गर्वगीत -कुसुमाग्रज
- ...नाम निफजे| कां वाक्यें म्हणिपती पुंजे| अक्षरांचे || १५२|| कां जळधरांचा मेळा| वाच्य होय ...द्न्यानेश्वरी अध्याय १३
- दश इंद्रियांचा एक मेळा केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥(-काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥..अभंगातून-संत एकनाथ
- माझ्या गं दारावरनं । मुलांचा मेळा गेला ।
- त्यात मी ओळखिला । माझा बाळ ॥ (ओवी
- नामकरण हा सुखसोहाळा
- उभय कुलांचा जमला मेळा
- आनंदोत्सव बघुनी डोळा, नेत्रद्वय धाले (पाळणा/बारशाची गाणी-बाळा जो जो रे)
शब्द वापरलेले वाक्प्रचार/म्हणी
संपादन- जाईचा डोळा नि आसवांचा मेळा.
शब्दाचे व्याकरण , प्रकार इत्यादी
संपादन- शब्द विग्रह
- मेळ+आ (बरोबर आहे का ?)
- शब्दातील प्रत्यय
- शब्दातील उपसर्ग
- शब्दातील संधी आणि समास
शब्दाशी संबंधित संधी आणि समास
संपादन- चोखामेळा
शब्दाची शक्य असलेली सर्व सामान्यरूपे
संपादन- मेहुणी या अर्थाने
- मेळाने,मेळाला,मेळाचे,मेळास,मेळाचा,मेळाची
- जत्रा या अर्थाने
- मेळ्यात,मेळ्याचे,मेळ्याला,मेळ्याने,मेळ्यास
विभक्ती | एकवचन | अनेकवचन |
---|---|---|
प्रथमा | मेळा | मेळे |
द्वितीया | मेळ्यास, मेळ्याला, मेळ्याते | मेळ्यांस, मेळ्यांना, मेळ्यांते |
तृतीया | मेळ्याने, मेळ्याशी | मेळ्यांनी, मेळ्यांशी |
चतुर्थी | मेळ्यास, मेळ्याला, मेळ्याते | मेळ्यांस, मेळ्यांना, मेळ्यांते |
पंचमी | मेळ्याहून | मेळ्यांहून |
षष्ठी | मेळ्याचा, मेळ्याची, मेळ्याचे | मेळ्यांचा, मेळ्यांची, मेळ्यांचे |
सप्तमी | मेळ्यात | मेळ्यांत |
संबोधन | मेळ्या १ | मेळ्यांनो १ |
१. या शब्दाचे या अर्थाने संबोधन सहसा वापरत नाहीत. |
- शब्दाची पदरूपे
- मेळाकडून,मेळ्याकडून,मेळ्यातून,मेळ्याहून,
शब्दाचा प्रकार
संपादन- नाम
- शब्दाचे उपप्रकार
- सामान्यनाम (मेहूणी या अर्थाने व्यक्तिवाचक)
- सामान्यनाम (समुह या अर्थाने समुहदर्शक)
- शब्दाचे प्रकारानुसार बदलणारे अर्थ
- शब्दाचे/पदाचे वाक्यातील स्थाना नुसार बदलणारे अर्थ
- शब्दाचे वचन
- एकवचन
- मेळा
- अनेकवचन (जत्रा अर्थाने)
- मेळे
- शब्दाचे लिंग
- मेहुणी अर्थाने वापरल्यास स्त्रीलिंग
- मेळावा किंवा जत्रा अर्थाने वापरल्यास पुल्लिंग
- शब्द केव्हा वापरावा
- अर्थानुरूप
- शब्द केव्हा वापरू नये
- या शब्दास असा नियम नाही
उद्भव
संपादन- शब्दाची व्युत्पत्ती
- देशीय/तत्सम/तद्भव/तामील/मल्यालम/कन्नड/तेलगू/गुजराथी/हिंदी/फारसी/उर्दू/अरेबिक/पोर्तुगीज/इंग्रजी/फ्रेंच/जर्मन/इतर भाषा
- शब्दाचा इतिहास आणि (प्रोटो इंडो-इराणी अथवा प्रोटो-इंडो-आर्यन शब्द उपलब्ध असल्यास)
- शब्द मोडीत कसा लिहिला असेल
- शब्द रोमन आणि इतर लिपीत कसा लिहावा
- meL'A
समानार्थी मराठी शब्द
संपादनसमानार्थी बोली शब्द
संपादनमेळा = जत्रा
समान उच्चारणांचे इतर मराठी शब्द
संपादन- खेळा,वेळा
इतर भाषांतील समानार्थी शब्द
संपादनभाषांतर करताना घ्यावयाची काळजी
संपादनहिंदी अर्थ- मराठीतली जत्रा, मेळा उदा. आज मेला लगा है.
मेला शब्दाचा मराठी अर्थ- मरणे चे एक रूप उदा. (अमका अमका) अपघातात मेला. (असा वाक्प्रयोग असभ्य समजतात. पण सदरहू उदाहरणासाठी वापरला आहे. क्षमस्व.)
हे सुद्धा पाहा
संपादनसंदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनवर्गीकरणे
- शब्दाच्या प्रकार/उपप्रकारानुसार/पद/लिंगविचार/वचनविचार/विभक्ती विचार/वाक्प्रचार/म्हणी/अल्पाक्षरी/संधी/समास/पद/वाक्यातील कार्य/काळ
- शिष्ट/अशिष्ट/सभ्य/असभ्य/प्रमाण/बोली/ऐतिहासिक/फक्त लिखित/शब्द रस शक्ती/ शब्दाचा मराठी भाषेतील वापर/शृंगारिक अर्थाचे/विषयवार पारिभाषिक संज्ञा/शालेय/अशालेय/चुकीचे लेखन दाखवलेले (असे लिहू नका);वर्णमाला,चिन्हे ,विरामचिन्हे,जोडाक्षरे
- वर्णानुक्रम/अंत्यस्वर/उपांत्यस्वर/अंत्यव्यंजन/ऱ्हस्व-दीर्घ,इकार-उकार/शब्दकोड्यातील रकान्यानुसार अक्षरसंख्या
- शब्दाचे भाषेतील वापराचे प्रमाणानुसार अनुक्रम/ भाषा उद्भव
- प्रबंधकीय श्रेणी: अपूर्ण/विवाद्य/अनिश्चित/विकिकरण/शुद्धलेखन सुधारणा/विशेष/चित्रे हवे/ मेडीया हवे/विशिष्ट संदर्भ असलेले-संदर्भ हवे असलेले.
- आंतरविकि दुवे