मराठी

संपादन
 
मुंगी

उच्चार/लिप्यंतर

संपादन
  • इंग्रजी (English): mungi
  • उर्दू : مُونگی
  • कन्नड : ಮುಂಗೀ
  • गुजराथी : મુંગી
  • तमिळ : முங்கீ
  • तेलुगू : ముంగీ
  • पंजाबी : ਮੁਂਗੀ
  • संस्कृत (संस्कृत): मुंगी
  • हिंदी (हिंदी) : मुंगी
  • प्रकार: समुदायवाचक सामान्यनाम
  • लिंग: स्त्रीलिंगी (पुल्लिंगी, नपुंसकलिंगी रूप होत नाही; सर्व मुंग्यांचा उल्लेख स्त्रीलिंगी होतो.) डोंगळा हा शब्द मोठ्या आकाराच्या मुंग्यांसाठी वापरतात. तो पुल्लिंगी आहे.
  • वचन: एकवचन (अनेकवचन : मुंग्या)
  • अर्थ:
  1. वारूळ करून राहणारे छोटे कीटक.

विभक्ती

संपादन
विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रथमा मुंगी मुंग्या
द्वितीया मुंगीस, मुंगीला, मुंगीते मुंग्यांस, मुंग्यांना, मुंग्यांते
तृतीया मुंगीने, मुंगीशी मुंग्यांनी, मुंग्यांशी
चतुर्थी मुंगीस, मुंगीला, मुंगीते मुंग्यांस, मुंग्यांना, मुंग्यांते
पंचमी मुंगीहून मुंग्यांहून
षष्ठी मुंगीचा, मुंगीची, मुंगीचे मुंग्यांचा, मुंग्यांची, मुंग्यांचे
सप्तमी मुंगीत मुंग्यांत
संबोधन मुंगे मुंग्यांनो

भाषांतरे

संपादन


वाक्यात उपयोग

संपादन
  1. 'वारूळ करून राहणारे छोटे कीटक' या अर्थाने:

अधिक माहिती

संपादन
वाक्प्रचार
संपादन
  • मुंग्या येणे - शरीराचा काही भाग बधिर होणे
  • सर्वांगाला मुंग्या येणे
म्हणी
संपादन
  • मुंगी होऊन साखर खावी : छोटेपणात सुख असते.
  • लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा : लहान मुलांना वा लहान माणसांना मोठ्यांपेक्षा जास्त सुख असल्याने तेच बरे.
संधी व समास
संपादन
  • मुंगीकर (एक आडनाव)

संकीर्ण माहिती

संपादन
साहित्यातील आढळ
संपादन
मुंगी उडाली आकाशी ही संत मुक्ताबाई यांची साहित्यकृती
"मुंगी उडाली आकाशी । तिने गिळले सूर्यासी ॥
थोर नवलाव झाला । वांझे पुत्र प्रसवला ॥
विंचु पाताळासी जाए । शेष वंदी त्याचे पाय ॥
माशी व्याली घार झाली । देखोनी मुक्ताई हसली ॥"
तत्सम उच्चारणांचे इतर शब्द
संपादन
  • इंग्रजी (English)

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन