mahitgar, तुम्ही 'मी' या मराठी शब्दाची खूप वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरे दिली आहेत हे कौतुकास्पद आहे. कृपया या सर्व भाषांतरांचा स्रोत सांगितलात तर सगळ्या संपादकांना त्या स्रोताकडे मदतीसाठी वळता येईल. तसेच या स्रोताची अधिकृतता अर्थात 'authenticity' देखील तपासून सर्वांना त्यावर जास्तीत जास्त भाषांतून भाषांतरे देण्यासाठी विसंबता येईल.

याशिवाय आणखी एक सरसकट सुधारणा म्हणजे स‍र्वच शब्दांसाठी भाषांतरे देताना खालील पद्धत पाळता येईल.


  • भाषेचे नाव देवनागरी लिपीत (भाषेचे मुळ नाव त्याच भाषेच्या लिपीत) : भाषांतर त्याच भाषेच्या लिपीत (भाषांतराचा उच्चार देवनागरी लिपीत)

उदाहरण : चांगला या मराठी शब्दाची भाषांतरे:

  • इंग्रजी (English) : good (गुड)
  • हिंदी (हिंदी) : अच्छा (अच्छा)

श्रीहरी,भाषांतरे इंग्रजी विक्शनरीतून घेतली आहेत. इंग्रजी विक्शनरीत त्या त्या भाषेच्या मायबोली असलेल्या व्यक्तिने तपासे पर्यंत न तपासलेल्या भाषांतराचे वेगळे वर्गीकरण करण्याची प्रथा आहे.आपली सूचना सर्वथा मान्य आहे. सारणी (टेबल) व्यवस्थित दिसावेत या करीता काही तांत्रीक सुधारणांची आवशकता आहे .त्यास शक्य तेवढे प्राधान्य देण्याचा मानस आहे.

धन्यवाद आपला Mahitgar १५:३९, ३० जून २००७ (UTC)Reply

"मी" पानाकडे परत चला.