अकरुण
मराठी भाषा
संपादनउच्चार
|
|
विशेषण
संपादन- प्रकार : नामसाधित गुणवाचक विशेषण
वचन
संपादनएकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)
लिंग
संपादनपुल्लिंगी / स्त्रीलिंगी / नपुसकलिंगी (नामाप्रमाणे)
अर्थ
संपादनज्याच्या ठायी करुणा नाही असा / जिच्या ठायी करुणा नाही अशी / ज्यांच्या ठायी करुणा नाही असे; निर्दय; दयाहीन.
भाषांतरे
संपादन
|
भाषांतर करताना घ्यायची काळजी
संपादनशब्द केव्हा वापरावा
संपादनकरुणेचा अभाव सौम्यपणे दाखवताना हे विशेषण वापरावे.
शब्द केव्हा वापरू नये
संपादनकरुणेचा अभाव तीव्रतेने दाखवताना हे विशेषण वापरू नये, त्याऐवजी निर्दय वा दयाहीन ही विशेषणे वापरावीत.
वाक्यात उपयोग
संपादन- एकवचनी रूपात : पर्जन्याच्या लहरीपणाने कमी पीक आल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली शेतसाऱ्यातून सूट मिळण्याची विनंती अकरुण राजाने फेटाळली.
- अनेकवचनी रूपात : कारणकार्य व परिणाम यांच्या बाबतीत काहीच अपवाद न दाखवणारे निसर्गाचे नियम अनेकदा अकरुण भासतात.
- पुल्लिंगी रूपात : अनियमीत पावसामुळे शेते विशेष चांगली पिकली नसल्यास शेतसाऱ्यात सवलत न देणारा अकरुण राजा शेतकऱ्यांच्या मनातून उतरतो.
- स्त्रीलिंगी रूपात : दोन वेळच्या अन्नाची ददात असणारे भिकारी रोज पाहून पाहून नकळत एखादी व्यक्ति त्यांच्याबाबतीत अकरुण होऊन जाते.
- नपुसकलिंगी रूपात : महासागरात टायटॅनिक जहाज बुडत असताना काही प्रवाशांना बारीक ओंडक्यांचा आसरा मिळाला खरा; परंतु अकरुण पाणी एव्हढे गार होते की, त्याच्या स्पर्शाने त्या प्रवाशांना आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखे झाले.
वाक्प्रचार
संपादनम्हणी
संपादनसाहित्यातील आढळ
संपादनसंधी व समास
संपादनउत्पत्ति
संपादनमूळ संस्कृत शब्द.
समानार्थी शब्द
संपादनकरुणारहित, क्रूर, कठोर. [१]
अधिकची माहिती
संपादन- नामसाधित विशेषणाचे उगमस्थान नाम : करुणा
- विरुद्धार्थी शब्द : करुण
- हे देखील पाहा : करुण, करुणा, करुणाकर, करुणामय, करुणामयी, कारुण्य.
तत्सम उच्चारणांचे इतर शब्द
संपादन
|
|
अधिकची माहिती
संपादनसंदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनसंस्कृत भाषा
संपादनहिन्दी भाषा
संपादन- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे