विक्शनरी:समुच्चयबोधक प्रधानसूचक उभयान्वयी अव्यय
उभयान्वयी अव्यय
संयुकत वाक्यातील प्रधान वाक्ये ही प्रधानसूचक उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांशी जोडलेली असतात. प्रधानसूचक उभयान्वयी अव्ययांचे चार विभाग आहेत .
• समुच्चयबोधक: आणि व आणखी ,इत्यादी • विकल्पबोधक: किंवा, अगर, अथवा इत्यादी • न्यूनत्वबोधक: पण परंतु, बाकी इत्यादी • परिणामबोधक : म्हणून , अतएव , सबब इत्यादी
- माधव, गोविंदा , गोपाळ व हरी हे काल गावाला गेले व लगेच परत आले.
- वारा आला आणि पाऊस गेला.
इतरेतर द्वंद्व समास: ज्या समासातील पदे आणि किंवा व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली असुन ज्या मध्ये हे अव्यय अध्याहृत असतात त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात उदा: • रामलक्षमण राम आणि लक्ष्मण • खारीकखोबरे खारीक आणि खोबरे • खानपान खान आणि पान • पानसुपारी पान आणि सुपारी