विक्शनरी:मदतीचा लेख
विक्शनरी हा कोणत्याही भाषेतील शब्दांची मराठीत माहिती देणारा एक मुक्त शब्दकोश आहे. ह्यात आपण नुसतेच शब्द नाही, तर मराठी अथवा इतर भाषांमधील वाक्प्रचारही त्यांच्या अर्थासहित टाकू शकता. खालील साच्यांचा उपयोग करावा. कोणत्याही शब्दासाठी लेख लिहीत असताना त्या शब्दाच्या प्रकारानुसार खालीलपैकी सुयोग्य नमुना साचा लेखाचा उपयोग करून त्याप्रमाणेच लेख लिहावा.
- भाषा शीर्ष
- अंतिम शीर्ष
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- क्रियापद
- क्रियाविशेषण
- शब्दयोगी अव्यय
- उभयान्वयी अव्यय
- केवलप्रयोगी अव्यय
हे नमुना साचे बर्याच संशोधनानंतर तयार करण्यात येत आहेत. तसेच हे नमुना साचे तुम्हाला वापरायला सर्वाधिक सोपे करण्याच्या उद्देशाने लिहिले गेले आहेत. ते तुम्हाला फक्त copy करून हवे तेथे paste करायचे आहेत. त्यात नको असलेले भाग तुम्हाला गाळायचे आहेत, अधिकची माहिती लिहायची आहे व निरनिराळ्या भाषांमध्ये अनुवाद द्यायचे आहेत.
मराठी विक्शनरीचा वापर जेव्हढा आनंद देईल तेव्हढाच आनंद मराठी विक्शनरीत योगदान देण्यात व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत.