वयम्
'वयम्'चा संस्कृत मधील अर्थ 'आपण सारे' असा होतो इतिहास
संपादनइतिहास
संपादन'अहम् आवाम् वयम्' हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. ‘वयम्’ या खास किशोरांसाठीच्या मासिकाचा दिवाळी अंक मुखपृष्ठापासूनच पाहावासा वाटतो. या अंकात कथा, कविता, प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती, लेख याची मेजवानी आहे. मुलांना वाचण्यासाठी वैविध्यपूर्ण असा ऐवज अंकात आहे. वय वर्षे ९ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ठाण्याच्या लॅबइंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट (‘वयम्’चे प्रकाशक) यांच्या आर्थिक पाठबळातून ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होते. ‘वयम्’चे बोधवाक्य आहे- ‘वाचनातून विचार, विचारातून विकास’. मुख्यत्वे शाळा व वाचनालयांत आमचे मासिक वितरीत होते. तसेच वाचनप्रेमी विद्यार्थी, शिक्षक व पालक आवर्जून ‘वयम्’चे वर्गणीदार होतात.
वयम् विषयी
संपादनशालेय वयातील मुलांना ताज्या घडामोडी, दैनंदिन विज्ञान, ललित साहित्य, कलाकृती, प्रयोग, कोडी, उपयुक्त वेबसाईट, इत्यादी मजकूर वाचायला मिळावा आणि त्यांनी विचारप्रवण व्हावे, म्हणून हे मासिक सुरू केले आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ ‘वयम्’मध्ये लिहितात. प्रत्येक महिन्याला एका ताज्या विषयाला बहुअंगाने भिडणारे लेखही यांत असतात. ‘वयम्’मधील बहुतांश मजकूर मराठीत असतो आणि एक-दोन लेख/गोष्टी इंग्रजीतून असतात. रंगीत टीव्ही बघणा-या आणि रंगीत संगणक वापरणा-या पिढीतील मुलांना आकर्षक वाटावे आणि त्यांच्यावर उत्तम डिझाईनचा संस्कार व्हावा, यासाठी आवर्जून उत्तम प्रतीच्या कागदावर रंगीत छपाई केली जाते. ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव ‘वयम्’चे सुलेखन करतात. एकंदर निर्मिती-मूल्यांकडे लक्ष दिले जाते. 'वयम्' मासिकाच्या संपादक संपादक – शुभदा चौकर आहेत.
‘वयम्’ च्या सल्लागार मंडळात आहेत- डॉ. अनिल काकोडकर, कुमार केतकर, डॉ.आनंद नाडकर्णी, अच्युत गोडबोले, डॉ. उदय निरगुडकर, राजीव तांबे आणि अभिनेती मृणाल कुलकर्णी. शिवाय, डॉ. बाळ फोंडके, भारत सासणे, सुबोध जावडेकर, मुकुंद टाकसाळे, प्रवीण दवणे, दासू वैद्य, डॉ. शरद काळे, डॉ. नंदिनी देशमुख, श्रीकांत बोजेवार, समीर कर्वे, श्रीराम शिधये, शमसुद्दिन अत्तार असे अनेक नामवंत लेखक ‘वयम्’च्या यादीत आहेत.
पुरस्कार
संपादनपहिल्या चारही वर्षी ‘वयम्’ दिवाळी अंकाला विविध पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात महाराष्ट्र साहित्य परिषद (म.सा.प.), कोकण मराठी साहित्य संघ (को.म.सा.प.), कल्याण सार्वजनिक वाचनालय, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, साप्ताहिक उल्हास प्रभात, दिन्मार्क पब्लिकेशन या संस्थांच्या पुरस्कारांचा समावेश आहे.