इंग्रजी (English): mungi
उर्दू : مُونگی
कन्नड : ಮುಂಗೀ
गुजराथी : મુંગી
तमिळ : முங்கீ
तेलुगू : ముంగీ
पंजाबी : ਮੁਂਗੀ
संस्कृत (संस्कृत): मुंगी
हिंदी (हिंदी) : मुंगी
मुंगी
प्रकार: समुदायवाचक सामान्यनाम
लिंग: स्त्रीलिंगी (पुल्लिंगी, नपुंसकलिंगी रूप होत नाही; सर्व मुंग्यांचा उल्लेख स्त्रीलिंगी होतो.) डोंगळा हा शब्द मोठ्या आकाराच्या मुंग्यांसाठी वापरतात. तो पुल्लिंगी आहे.
वचन: एकवचन (अनेकवचन : मुंग्या )
अर्थ:
वारूळ करून राहणारे छोटे कीटक .
विभक्ती
एकवचन
अनेकवचन
प्रथमा
मुंगी
मुंग्या
द्वितीया
मुंगीस , मुंगीला , मुंगीते
मुंग्यांस , मुंग्यांना , मुंग्यांते
तृतीया
मुंगीने , मुंगीशी
मुंग्यांनी , मुंग्यांशी
चतुर्थी
मुंगीस , मुंगीला , मुंगीते
मुंग्यांस , मुंग्यांना , मुंग्यांते
पंचमी
मुंगीहून
मुंग्यांहून
षष्ठी
मुंगीचा , मुंगीची , मुंगीचे
मुंग्यांचा , मुंग्यांची , मुंग्यांचे
सप्तमी
मुंगीत
मुंग्यांत
संबोधन
मुंगे
मुंग्यांनो
'वारूळ करून राहणारे छोटे कीटक ' या अर्थाने:
मुंगी सारखे कामसू व्हावे.
मुंग्या येणे - शरीराचा काही भाग बधिर होणे
सर्वांगाला मुंग्या येणे
मुंगी होऊन साखर खावी : छोटेपणात सुख असते.
लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा : लहान मुलांना वा लहान माणसांना मोठ्यांपेक्षा जास्त सुख असल्याने तेच बरे.
मुंगी उडाली आकाशी ही संत मुक्ताबाई यांची साहित्यकृती
"मुंगी उडाली आकाशी । तिने गिळले सूर्यासी ॥
थोर नवलाव झाला । वांझे पुत्र प्रसवला ॥
विंचु पाताळासी जाए । शेष वंदी त्याचे पाय ॥
माशी व्याली घार झाली । देखोनी मुक्ताई हसली ॥"
तत्सम उच्चारणांचे इतर शब्द
संपादन
मुंडावळी on Wikipedia.Wikipedia