बकुळ
मराठी
संपादनव्युत्पत्ती / शब्दांची माहिती
संपादनबकुल या संस्कृत नामाचे तद्भव रूप
उच्चार
संपादन- उच्चारी व्यंजनान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : विशेषनाम
- लिंग : स्त्रीलिंग / नपुसंकलिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- स्त्रीलिंगी रूपाचे सरळ एकवचनी रूप : बकुळ
- स्त्रीलिंगी रूपाचे सरळ अनेकवचनी रूप : बकुळी
- स्त्रीलिंगी रूपाचे सामान्य एकवचनी रूप : बकुळी-
- स्त्रीलिंगी रूपाचे सामान्य अनेकवचनीरूप : बकुळीं-
अर्थ
संपादन- बारीक सुगंधी फुले देणारा एक उंच, काटेरी, सदपर्णी फुलझाड.
- उदाहरण : सोहमने बागेत बकुळीचे फुलझाड लावले.
प्रतिशब्द
संपादन- हिंदी : बकुल
- इंग्रजी : Spanishcherry
- वनस्पतीशास्त्रातील नाव (Botanical name)- मिमसॉप्स एलेंगी (Mimusops elengi)
अधिकची माहिती
संपादन- बकुळ झाडाच्या फुलांनाही बकुळ याच नावाने ओळखले जाते.
- वृक्ष ह्या अर्थाने बकुळ ह्या शब्दाचे लिंग पुल्लिंग येईल.