पडणे
मराठी
संपादनशब्द वर्ग
संपादनधातू
मूळ धातुरुप
संपादनपड
व्याकरणिक विशेष
संपादनधातुप्रकर-अकर्मक
अर्थ
संपादन- खाली येणे,गळणे.उदा, किल्ल्यावरून दगड खाली पडला.
- असणे.उदा,इथून तुमचे घर भरपूर लांब पडतं.
- जमिनीवर अंग टाकणे.उदा, येथे काय पडलास कामावर जा.
- बंद होणे.उदा, चांगला चाललेला धंदा अचानक बंद पडला.
- किंमत किंवा भाव कमी होणे.उदा,हल्ली सोन्याचा भाव पडला आहे.
- एखाद्या वस्तू इत्यादीचे चिह्न वा डाग राहणे.उदा,शाईचा डाग कपड्यावर पडला आहे.
- इतरांच्या एखाद्या विषयात मध्येच जाणे वा जाऊन मत मांडणे.उदा,नवरा-बायकोच्या भांडणात पडू नये.
- आवश्यकता वा गरज असणे.उदा,आपल्याला काय पडली आहे, त्यांचे ते बघून घेतील.
समानार्थी शब्द
संपादन- पडण्याची क्रिया.
- उतरणे.
- घटणे.
- हस्तक्षेप करणे.
हिंदी
संपादनगिरना(धातू)