घसा
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादननाम
व्याकरणिक विशेष
संपादनलिंग- पुल्लिंग
रूप वैशिष्टे
संपादन- सरळरूप एकवचन:घसा
- सरळरूप अनेकवचन:घसे
- सामन्यरूप एकवचन:घश्या-
- सामन्यरूप अनेकवचन:घश्यां-
अर्थ
संपादन- पडजिभेपासून खाली जाणारा अन्ननलिकेच्या वरच्या टोकापर्यंतचा आतील भाग.उदा,घशातून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होते.
- मानेच्या आतला भाग.उदा,माझा घसा सुखला आहे, मला पाणी दे.
- आवाज,कंठध्वनि.उदा,त्याचा घसा गोड आहे.
- बळकावणे.उदा,सरकारचा विचार इंदूरची इस्टेट घशांत टाकण्याचा होता.
समानार्थी शब्द
संपादन- गळा.
- नरडे.
- कंठ.
हिंदी
संपादनगला(नाम)