कारभार
कारभार (पु)
- अर्थ: राज्य, सावकारी किंवा एखादा धंदा अगावर घेऊन त्यासाठी करावयाची सर्व त-हेची खटपट, व्यवस्था; उद्योगधंदा; काम
- व्युत्पत्ती. सं. कार्यभार; फारसी. कार-ओ-बार
- तदाधारित. कारभारी, कारभारीण
- वाक्प्रचार: करील त्याचा कारभार, मारील त्याची तरवार, राखील त्याचे घर, व खपेल त्याचे शेत; कारभार नाही, तर करभार नाही; कारभारात गुह्यपण, हेच त्याचे साधन;
- उतारे/ अवतरणे: कालवा वाहता ठेवण्याचा कारभार नेमका कोणाच्या आदेशाने सुरू आहे, या कोड्याची उकल करण्याची जबाबदारी 'कारभारी' घेताना दिसत नाहीत - महाराष्ट्र टाइम्स; सरकारचे काम त्याच्या पूर्ण मुदतीपर्यंत कारभार करण्याचे आणि त्यांनी कारभारात चुका, टाळाटाळ, दिरंगाई, लबाड्या केल्या तर त्यांना झोडून काढणे हे पत्रकारांचे काम - पंढरीनाथ सावंत