कच्चा
Adjective(7)
1. (R) अननुभवी, नवखा, नवा, कच्चा - अनुभव नसलेला "तो ह्या बाबतीत अजून अननुभवी आहे" 2. (R) कच्चा - व्यवस्थित न शिजलेला "भाजी कच्ची राहिली" 3. (R) कच्चा, अपक्व - न पिकलेला "कच्ची फळे तोडू नयेत" 4. (R) निरसा, कच्चा - न तापवलेला "डोळ्यांचा दाह होत असल्यास डोळ्यांत निरसे दूध घालतात" 5. (R) कच्चा - न शिजवलेला "कच्च्या भाज्या वाळवून सांडगे करतात" 6. (R) कच्चा - जो पक्का करण्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागतात असा "बहुतेक कंपन्या कच्चा माल आयात करतात." 7. (R) तकलादू, कमजोर, नाजूक, कच्चा, तकलादू - दृढ नसलेला "तकलादू वस्तू सहज तुटतात."