आटणे
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- उष्णतेने घट्ट होणे.( याच पद्धतीने दुधापासून बासुंदी बनवतात)
- लांबीरुंदीने कमी होणे,आखूड होणे. (धुतल्यावर कापड चोपड वगैरे)
- कमी होणे( झऱ्याचे,विहिरीचे वगैरे पाणी ) वाळणे,कोरडे पडणे.
- संपणे,कमी होणे,खलास होणे.(धान्याचा साठा वगैरे)
- वितळविणे.( सोने वगैरे) [सोने इ. वितळवणे ह्या अर्थाने 'अटणे' हे क्रियापद योजिले जाते पण तो अशुद्ध उपयोग होय.]
- अधिक माहिती :
- अटता काळ अटता पाया - अपकर्षाचा काळ उतरती कळा.
- समानार्थी शब्द : अटणे.
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. आटणे on Wikipedia.Wikipedia