मराठी संपादन

उच्चारविशेष संपादन

  • उच्चारी व्यंजनान्त : अभ्यासक्

नाम संपादन

लिंग : पुल्लिंग

रूपवैशिष्ट्ये संपादन

  1. अनेकवचन : अभ्यासक
  2. सामान्य रूप : अभ्यासका-
  3. अनेकवचनी सामान्य रूप : अभ्यासकां-

अर्थ संपादन

  1. अभ्यास करणारी व्यक्ती.
तिचा स्वभाव अभ्यासकाचा आहे.

विशेषण संपादन

विशेषणवर्ग : गोड गण

रूपवैशिष्ट्ये संपादन

विशेषण म्हणून येताना रूपात बदल नाही.

अर्थ संपादन

  1. अभ्यास करणारा/ करणारी
त्यांच्यासारखी अभ्यासक व्यक्ती सापडणे कठीण आहे.
रा. चिं. ढेरे हे संतवाङ्मयाचे फार मोठे अभ्यासक होते.

प्रयोगवैशिष्ट्ये संपादन

  • विशेषण म्हणून बहुतांश वेळा विधिविशेषण म्हणून वापर.