मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. एक पूर्वकालीन तांब्याचे नाणे,ज्याची किंमत अर्ध्या रुक्या इतकी होती.
  2. जमिनीच्या मापनात अर्धा रुका विस्ताराची.
  3. पैसा,द्रव्य (सामान्यतः).
  • अधिक माहिती :
  1. अडक्याची केली वाण लोणच्याची झाली घाण - लोणचे टिकाऊ होण्यासाठी त्यात जी मीठ वगैरे द्रव्ये घालवायची यात काटकसर केल्यास लोणच्यात आळ्या,पाखरे इ.उत्पन्न होऊन ते लोणचे टाकून द्यावे लागते.
  2. हाती नाही अडका बाजारात चालला धडका - हातात पैसा नसून मोठमोठे बेट करणे, हा मूर्खपणा.
  3. अडक्याची देवता तिला सापिक्याचा शेंदूर - क्षुल्लक वस्तू उपयोगी करून घेण्यासाठी किंवा शोभिवंत करण्यासाठी किंवा सजविण्यासाठी त्या वस्तूच्या किमतीहून अधिक खर्च करणे हा मूर्खपणा.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अडका on Wikipedia.Wikipedia