अट
{{=मराठी=}
- शब्दार्थ :
- अडचण.
- हरकत.
- गाडीच्या चाकाखाली ते घरंगळू नये म्हणून जो धोंडा लावतात किंवा ठेवतात तो.
- हेकटपणा,हट्ट.
- शर्त.
- सारंगी,वीणा,वगैरे चे तंतू ज्या घोडीवरून किंवा पट्टीवरून नेलेले असतात ती.
- मोट वगैरे थांबल्यावर पूर्वीच्या मोटेतील पाणी जे अजून वाहत असते ते.
- जड पदार्थ जागेवरून हलविण्यासाठी किंवा सरकवण्यासाठी तिच्या खाली जी काठी घालतात ती;तरफ.
- कोष्ट्याच्या मागातले एक महत्त्वाचे हत्यार.
- बैदुलांच्या खेळात बैदुल ज्या बोटाने माराक्याचा त्याला निश्चल आधार मिळावा म्हणून त्या हाताचा अंगठा जमिनीवर टेकतात तो.
अधिक माहिती :
- अटकर - (विशेषण) हट्टी, अटीतटी घालणारा,हेकेखोर.
- अटीस पेटणे - हट्टास पेटणे, इरेस चढणे;येणे.
- अटीचा खेळ - काहीतरी शर्त लावून खेळावयाचा खेळ.
- अटीची चाकरी -काही विशिष्ट शर्तीवर केलेली किंवा करावयाची नोकरी.
- अटीचा करार/अटीची बोली - उभय पक्षांनी ज्याला मान्यता दिली आहे असा ठराव किंवा व्यवहार.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अट on Wikipedia.Wikipedia