अक्कल
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : तारतम्य जाणण्याची शक्ति, बुद्धि
- अधिक माहिती : मराठी भाषेतील वापर -
- अक्कलहुशारीने (क्रियाविशेषण) : जाणतेपणाने, पूर्णपणे समजून उमजून, पूर्ण विचाराने, फसगतीने नव्हे; दुसऱ्याच्या आग्रहाने, भिडेने वगैरे नव्हे. (दस्तऐवज वगैरेंत हा शब्द विशेष वापरतात.) / सावधगिरीने.
- अकलेचा कांदा, अकलेचा खंदक (पुल्लिंगी) : मूर्ख, बिनअकली माणूस.
- अक्कल विकत घेणे - नुकसानी झाल्यावर शहाणपणा शिकणे.
- अक्कलसे खुदा पछानना - बुद्धीचा नेटाने, इमानाने, उपयोग केल्यास देवाचे स्वरूपही ओळखणे शक्य आहे.
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : अक्ल = बुद्धि, शहाणपणा
- लिंग : स्त्रीलिंगी
[१] अक्कल on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे